महाराष्ट्र

maharashtra

जळगावात विना मास्क अन् दुचाकीवरुन ट्रिपलसीट फिरणाऱ्यांवर कारवाई

By

Published : Aug 10, 2020, 7:06 PM IST

जळगावमध्ये अर्थचक्रास गती मिळण्यासाठी काही नियम व अटींसह मार्केट अनलॉक करण्यात आले आहेत. मात्र, अनेक जण नियम धाब्यावर बसवून कोरोनाला आमंत्रण देत फिरत आहेत, अशांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली तर काही जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

file photo
file photo

जळगाव - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी शासन, प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे मार्केटमध्ये खरेदीसाठी येणारे नागरीक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपण तोंडावर मास्क न लावता फिरत आहेत. अशा विना मास्क लावून फिरणारे, दुचाकीवरुन ट्रिपलसीट फिरणाऱ्यांवर शहर पोलिसांनी सोमवारी (दि. 10 ऑगस्ट) टॉवर चौकात धडक कारवाई करत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले.

अर्थचक्रास गती मिळण्याच्या उद्देशाने मार्केट अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे खरेदीसाठी लोकांची गर्दी देखील होते आहे. अशात सुरक्षेचे नियम पाळणे देखील आवश्यक आहे. शहरात फुले मार्केट हा मध्यवर्ती भागातील गजबजणारा परिसर असल्याने तेथे खरेदीसाठी गर्दी होते आहे. अशात अनेक लोक नियम मोडत आहेत. यामुळे सोमवारी सकाळपासून शहर पोलिसांचे पथक टॉवर चौकात तैनात करण्यात आले होते.

पथकाने सर्व बाजुंनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून चाैकशी केली. यात ट्रिपलसीट फिरणाऱ्या 13 दुचाक्या आढळून आले. तसेच सात जण तोंडावर मास्क न लावता फिरताना आढळले. फिजीकल डिस्टंन्सींगचा नियम मोडताना दोन जण मिळून आले. या सर्व जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काहींनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतूक शाखेच्या पथकाने देखील कारवाया शहरात केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details