जळगाव - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहेत. ते आमच्या तीनही पक्षांमध्ये भांडणे होऊच देत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे, असा चिमटा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काढला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'ला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ETV Bharat Exclusive : 'आमचे कॅप्टन खूप चांगले, भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच करावे लागणार काम' - यशोमती ठाकूर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप उत्तम प्रकारे नेतृत्व करत आहेत. ते आमच्या तीनही पक्षांमध्ये भांडणे होऊच देत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपला पुढची चार वर्षे विरोधी पक्ष म्हणूनच काम करावे लागणार आहे, असा चिमटा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी काढला.
यशोमती ठाकूर आज (शुक्रवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत भदाणे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने संवाद साधला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी विविध प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली.
सक्षम, सुदृढ महाराष्ट्राची निर्मिती हाच वर्षपूर्तीचा संकल्प-
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने माझा सक्षम, सुदृढ महाराष्ट्राची निर्मितीच्या अनुषंगाने प्रयत्न करणे, हाच संकल्प असल्याचेही त्या म्हणाल्या.