जळगाव- खासगी बसने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी शहरातील कालिका माता मंदिराजवळ महामार्गावर घडली.
या अपघातात नारायण दौलत पाटील (रा.सामनेर, ता.पाचोरा) यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या सोबतचे गणेश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते कालिका माता मंदिराजवळ दुचाकी (क्र. एमएच 19 बी. यू. 7777) वरून जळगाव शहराकडे येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी खासगी बस (क्र. एम एच 04 जी 8805) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नारायण पाटील हे चाकात येऊन चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे सोबत असलेले गणेश पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात महामार्गावर कालिका माता मंदिराजवळ गोदावरी कॉलेज समोर झाला.
जळगावात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी - बस दुचाकी अपघात
जळगाव शहरातील कालिका माता मंदिराजवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
अपघातग्रस्त वाहन
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार विजय नेरकर, इम्रान सय्यद, मुकेश पाटील, सचिन चौधरी, चालक भूषण सोनार यांच्यासह अपघातस्थळी धाव घेतली. जखमीला त्यांनी दवाखान्यात रवाना केले. तसेच वाहतूक सुरळीत केली.
हेही वाचा -जळगावमध्ये मास्क घालायला सांगितल्याच्या रागातून माथेफिरूची प्रांतधिकाऱ्याला शिवीगाळ