जळगाव- शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चित्रा चौकात ट्रकने एका दुचाकीस्वाराला चिरडले. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिल श्रीधर बोरोले (वय 68, रा. पोस्टल कॉलनी, जळगाव), असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वार वृद्धाचे नाव आहे.
जळगावात ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; खड्ड्यामुळे घडली घटना
चित्रा चौकातून जात असताना बोरोलेंची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बोरोले यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यावर खाली पडले. याच वेळी त्यांच्या पाठीमागून (एमएच 04 डीडी 6453) क्रमांकाचा ट्रक येत होता. या ट्रकचे मागचे चाक बोरोले यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अनिल बोरोले हे उद्योजक होते. शहरातील औद्योगिक वसाहतीत त्यांची निरंजन इलेक्ट्रिकल्स नावाची कंपनी असून त्यात इलेक्ट्रिकल्स पॅनल व इतर उपकरणे तयार केली जातात. शनिवारनिमित्त कंपनीला सुटी असल्याने ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या (एमएच 19 डीबी 4048) क्रमांकाच्या दुचाकीने किरकोळ कामांसाठी शहरात आले होते. चित्रा चौकातून जात असताना त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेली. त्यामुळे बोरोले यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते रस्त्यावर खाली पडले. याच वेळी त्यांच्या पाठीमागून (एमएच 04 डीडी 6453) क्रमांकाचा ट्रक येत होता. या ट्रकचे मागचे चाक बोरोले यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघातानंतर बोरोले यांचा मृतदेह बराच वेळ घटनास्थळी पडून होता. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बोरोले यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील रस्त्यांवरील उघडे चेंबर, खड्डे, गटारींवरील तुटलेले ढापे यांचा विषय ऐरणीवर आला आहे. अमृत योजनेमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. या अपघातामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे.