जळगाव -जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेतलेल्या ३४ कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाले. यापैकी ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर २ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या व्यक्तींमध्ये एक २४ वर्षीय तरूण हा जळगावातील मारुतीपेठेतील असून, दुसरी व्यक्ती २१ वर्षीय महिला ही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील चिंचोल येथील मूळ रहिवासी आहे. ती सध्या जळगावातील समतानगर येथे राहत होती. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी दुपारपर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे. यापैकी १२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, शुक्रवार व शनिवारी जळगावात ३, भुसावळ २, पाचोरा २ तर अमळनेरात १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जळगाव शहरात गेल्या ४ दिवसात ६ रुग्ण आढळल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अमळनेर पाठोपाठ आता भुसावळ,जळगाव व पाचोरा येथील रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रुग्णांची संख्या ३७ इतकी होती, त्यात दोन दिवसात ८ रुग्णांची भर पडून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहचली आहे.
जिल्ह्यातील मृत्युदर अधिक -