जळगाव -शहरातील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः वाट लागली आहे. भाजप सत्ताधारी असलेल्या महापालिकेकडून रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसने स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अभियानाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. हे पाहून हादरलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. इतके दिवस हातावर हात धरून बसलेल्या प्रशासनाला कुंभकर्णी झोपेतून जागे करत तत्काळ रस्ते दुरुस्तीच्या कामाला लावले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच द्वंद पाहायला मिळाले.
जळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजपची कोंडी; राष्ट्रवादी काँग्रेसने गाठले खिंडीत - जळगाव राष्ट्रवादी आंदोलन बातमी
शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहनेच काय तर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट असताना देखील महापालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना केली नाही.
शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्त्यांवरून वाहनेच काय तर पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट असताना देखील महापालिका प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना करत नाही. त्यामुळे लोकभावना तीव्र झाल्या आहेत. नागरिकांचा हा रोष लक्षात घेत नुकतेच शिवसेनेच्या वतीने सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी खड्डेमय रस्त्यांवर रांगोळ्या काढत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही गेंड्याच्या कातडीचे प्रशासन जागचे हलले नव्हते. मात्र, आज राष्ट्रवादी काँग्रेसने स्वखर्चाने रस्ते दुरुस्तीला सुरुवात करताच सत्ताधारी भाजप आणि प्रशासन वठणीवर आले. प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष तसेच विधानसभा निवडणुकीतील जळगाव शहर मतदारसंघातील पराभूत उमेदवार अभिषेक पाटील यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची घोषणा करताच या साऱ्या घडामोडी घडल्या.
प्रशासनाला आताच जाग कशी?
गेल्या महिनाभरापासून शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाला असताना महापालिका प्रशासनाने आतापर्यंत त्याची दखल घेतली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने खड्डे बुजविण्याचे अभियान सुरुवात करताच महापालिकेतील सत्ताधारी भाजपसह प्रशासनाला लाज वाटल्यानेच त्यांनी देखील खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याच्या भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.