महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Patil Corona Positive: मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण - सोशल मीडिया

मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील (Muktainagar MLA Chandrakant Patil) यांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतः सोशल मीडियावर (social media) कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे, तसेच संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

Chandrakant Patil
आमदार चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 1, 2022, 11:53 AM IST

Updated : Jan 1, 2022, 5:41 PM IST

जळगाव:राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा डोके वर काढत आहे. जळगाव जिल्ह्यात त्याचे पडसाद पहावयास मिळत आहेत. तर गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात तब्बल दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पेजवर माहिती दिली आहे. 'मी आणि माझा स्वीय सहाय्यक आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली टेस्ट करून घ्यावी.व कोरोनाचे नियम पाळा व काळजी घ्या' असे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

Last Updated : Jan 1, 2022, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details