जळगाव - शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी (IT Raid) केली. या बाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी आता एलसीबीसारखी झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आयकर विभागाने छापेमारी केली. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, एलसीबीसारखी आता ED झाली असून, रोज मरेमरे त्याला कोण रडे अशी परिस्थिती या ED ने केली आहे. जोपर्यंत चालवायचे तोपर्यंत चालू द्या, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.