महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनता कर्फ्यू :  भूकने व्याकुळ मनोरुग्ण महिलेस मिळाला मदतीचा हात

पालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाचे निरीक्षक सुभाष थोरात आणि डॉ. चेतन बडगुजर हे शहरात आवाहन करत असताना त्यांना महामार्गावरील न्यायालयाच्या गेटसमोर एक वयस्कर महिला मनोरुग्ण भुकेची आस लावून बसल्याचे लक्षात आले. यानंतर थोरात व डॉ. बडगुजर यांनी माणूसकीपण दाखवत महिलेस अन्न व पाणी दिल्याने तिचे मन गहीवरून आले.

janta curfew jalgaon
महिला मनोरुग्णाचे दृश्य

By

Published : Mar 22, 2020, 7:50 PM IST

जळगाव- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज देशभरात 'जनता कर्फ्यू' राबविण्यात आला आहे. शहरातही 'जनता कर्फ्यू'ला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. मात्र, शहरातील हॉटेल्स, नाश्त्याच्या गाड्या बंद असल्याने रस्त्यावर फिरणाऱ्या एक वृद्ध महिला मनोरुग्णावर उपासमारीची वेळ आली होती. या मनोरुग्णाला पारोळा येथील नगरपालिका कर्मचारी व डॉक्टरांनी माणुसकी जपत अन्न व पाणी देऊन तिची भूक भागवली आहे. स्वार्थाने बरबटलेल्या जगात आज देखील माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून दिसून आला आहे.

सर्वत्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन महसूल, नगरपालिका, पोलीस, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेचे कोरोना नियंत्रण पथकाचे निरीक्षक सुभाष थोरात आणि डॉ. चेतन बडगुजर हे शहरात आवाहन करत असताना त्यांना महामार्गावरील न्यायालयाच्या गेटसमोर एक वयस्कर महिला मनोरुग्ण भुकेची आस लावून बसल्याचे लक्षात आले. यानंतर थोरात व डॉ. बडगुजर यांनी माणुसकीपण दाखवत महिलेस अन्न व पाणी दिल्याने तिचे मन गहीवरून आले.

ऐरवी ही वृद्ध महिला शहरात मिळेल त्या ठिकाणी अन्न खाऊन वाटेल त्या ठिकाणी गुजरान करत होती. मात्र, आज जनता कर्फ्यूमुळे ती अन्नासाठी व्याकूळ झाली होती. परंतु, देवरुपात आलेले थोरात व बडगुजर यांच्यामुळे तिची भूक भागल्याने आज देखील माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय समोर आला.

हेही वाचा-कोरोना: जळगावात २० पैकी ११ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details