जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील 27 वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या दोन चिमुकल्यांसह धावत्या रेल्वेसमोर उडी घेवून आत्महत्या ( Man Committed Suicidewith child ) केली आहे. ही घटना नगरदेवळा रेल्वेस्थानकावर घडली. जितेंद्र दिलीप जाधव ( रा. बोरखेडा ता. चाळीसगाव), चिराग जितेंद्र जाधव (वय 6 वर्षे) व खुशी जितेंद्र जाधव (वय 4 वर्षे), अशी तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्यास आहे. जितेंद्र व पुजा जाधव यांच्यात मागील अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. पुजाने तिचा भाऊ भुषण, काका सुधाकर व काकू यांना चाळीसगाव येथे बोलावून ग्रामीण पोलीस ठाण्यात ( Chalisgaon Gramin Police Station ) जितेंद्र विरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर पुजा माहेरी निघून गेली तर जितेंद्र हा दोघा चिमुकल्यांना घेऊन बोरखेडा येथे गेला. दरम्यान, रविवारी (दि. 13 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला.
दोन्ही मुलांना खावू घातला वडापाव -बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर त्याने दोघांना वडापाव खाऊ घातले. त्यानंतर ते दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आली. त्यामुळे त्यांनी चिमुकल्यांचा व जितेंद्रचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान, त्यांनी कजगाव, वाघळीपर्यंत रेल्वेरुळ पिंजून काढल्यानंतर ते आढळून आले नाही. नगरदेवळा रेल्वेस्थानकावर जवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतानाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी ही दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी बोरखेडा येथे घटनेविषयीची माहिती दिली.
धावत्या रेल्वेखाली उडी घेवून केली आत्महत्या -सकाळी 11 वाजता सचखंड एक्सप्रेस या धावत्या रेल्वेसमोर जितेंद्रने दोन्ही चिमुकल्यांसह उडी घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती पाचोरा येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांना ( Railway Police ) मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे बोरखेडा या गावात मोठी शोककळा पसरली आहे.
हेही वाचा -Gulabrao Patil clarification on controversial statement : अभिनेत्रीचा गाल सोडला व ओम पुरीचा गाल पकडला - गुलाबराव पाटील