जळगाव : पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात विविध माध्यमांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यावरून लढत अटीतटीची असल्याचे दिसून येत आहे. पण शेवटी जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडे असल्याने सत्ता ममता बॅनर्जी यांचीच येईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
'पश्चिम बंगालमध्ये लढत अटीतटीची, पण सत्ता ममता बॅनर्जींचीच येणार' - west bengal assembly election
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी सकाळी जळगावात आले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात विरोधकांकडून होणाऱ्या राजकारणाचा निषेध नोंदवला.
महाराष्ट्र दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी सकाळी जळगावात आले होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात विरोधकांकडून होणाऱ्या राजकारणाचा निषेध नोंदवला.
...तर गिरीश महाजनांचा भर चौकात सत्कार करेन
कोरोना महामारीच्या कठीण काळात विरोधकांकडून राजकारण केले जात आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कालच मुख्यमंत्र्यांनी लसीबाबत घोषणा करताना सांगितले की, आम्ही राज्यासाठी 12 कोटी डोस केंद्राकडून घ्यायला तयार आहोत. त्याचा धनादेश देखील तात्काळ देऊ. राज्य सरकार जर लस घ्यायला तयार आहे; तर लस देण्याचा अधिकार कोणाला आहे? हे सर्वांना माहिती आहे. आगामी दोन ते अडीच महिन्यांत संपूर्ण राज्याचे लसीकरण होईल एवढी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. जोपर्यंत लसींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत देव जरी आला तरी लसीकरण होऊ शकत नाही. बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी गिरीश महाजन यांचे कौतुक केले होते. त्यांचा जर केंद्रात यामुळे प्रभाव पडला असेल तर गिरीश महाजन यांनी केंद्राकडून जळगाव जिल्हा आणि राज्यासाठी लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा. असे झाले तर त्यांचा जाहीर चौकात सत्कार करेल, अशी ग्वाही मी देत असल्याचा चिमटा गुलाबराव पाटील यांनी यावेळी काढला.