जळगाव - राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. रोज राज्यात नवीन रुग्णांनी उच्चांकी नोंद केली ( Maharashtra corona Cases Increased ) आहे. त्यात अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण (Gulabrao Patil Corona Positive ) झाली आहे. एक निवेदन प्रसिद्ध करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
Gulabrao Patil Corona Positive : पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना कोरोनाची लागण - महाराष्ट्र कोरोना बातमी
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांना कोरोनाची बाधा (Gulabrao Patil Corona Positive ) झाली आहे. एक जाहीर निवेदन प्रसिद्ध करुन त्यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Gulabrao Patil
गुलाबराव पाटील यांनी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी होम क्वारंटाईन झालो आहे. मला कोणतीही तीव्र लक्षणे आढळून आलेली नसून माझी प्रकृती ही पूर्णपणे बरी आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच स्वत:ची काळजी घ्यावी," असे आवाहनही त्यांनी ( Gulabrao Patil Corona ) केले आहे.