महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाणीत आढळले ; जळगावमधील घटना - खाणीत मृतदेह

प्रिया आणि जयेश यांचे प्रेमसंबंध होते. जयेश हा २ रोजी जळगाव येथून मित्राची दुचाकी घेऊन पाळधी येथे आला. यानंतर......

रस्त्याच्या कडेला असलेल्या खाणीमधील पाण्यात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली

By

Published : Oct 5, 2019, 9:03 AM IST

जळगाव - रस्त्याच्या कडेला असलेल्या खाणीमधील पाण्यात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली आहे. खाणीजवळून जाताना दुचाकी पाण्यात घसरुन त्यांचा अपघात झाल्याचा अंदाज असून, प्रिया दत्तात्रय पाटील (वय १७) व जयेश दत्तात्रय पाटील (वय १९) अशी मृतांची नावे आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या खाणीमधील पाण्यात एका प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यात घडली

पाळधी येथे चांदसर रस्त्यालगत असलेल्या वीटभट्टीतील खोल खाणीतील पाण्यात या प्रेमीयुगुलाचे मृतदेह तरंगताना स्थानिक वीटभट्टी कामगार अर्जुनसिंग बारेला यांना दिसले. यानंतर वीटभट्टीचे मालक अनिल कासट यांनी संबंधित माहिती पाळधी पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. यानंतर मृतदेहांची गावातील लोकांकडून ओळख पटवण्यात आली. दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.

हेही वाचामिना नदीत बुडालेल्या तीनही मुलांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिया पाटील ही २ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली होती. शोधाशोध केल्यानंतरही पत्ता न लागल्याने तिच्या वडिलांनी ३ तारखेला तक्रार नोंदवली होती. यामध्ये आपल्या मुलीला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा उल्लेख आहे. तक्रारीनंतर पुढच्या दिवशीच या दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रिया आणि जयेश यांचे प्रेमसंबंध होते. जयेश हा २ रोजी जळगाव येथून मित्राची दुचाकी घेऊन पाळधी येथे आला. तर प्रियाने आपण जळगावला कॉलेजला जात असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. दरम्यान, वीटभट्टी बंद असल्याने या परिसर निर्जन आहे. पाण्याच्या खड्ड्याजवळून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीचा तोल गेल्याने दोघे खड्ड्यात पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details