महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 30, 2021, 4:50 PM IST

ETV Bharat / state

जळगावमध्ये हार्डवेअर गोडावूनला आग; लाखोंचे नुकसान

शहरातील सुप्रिम कॉलनीतील एका हार्डवेअरच्या गोडावूनला दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक लागली. या आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसून अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

loss of millions rupees in hardware godown fire in jalgaon
जळगावमध्ये हार्डवेअर गोडावूनला आग; लाखोंचे नुकसान

जळगाव -आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील सुप्रिम कॉलनीतील एका हार्डवेअरच्या गोडावूनला अचानक लागली. या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. तसेच एमआयडीसी पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

हार्डवेअर गोडावूनला आग

अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी -

शहरातील शाहीद शेख मुस्ताक शेख (२८) रा. मास्टर कॉलनी यांचे नशिराबाद येथील आठवडी बाजारात स्टार हार्डवेअरचे दुकान आहे. सुप्रिम कॉलनीतील ममता बेकरीजवळ मित्रांच्या जागेवर या दुकानाचे गोडावून आहे. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये चिनीमातीचे टॉयटेलसह, पाण्याच्या टाक्या आदी सामान ठेवले जाते. आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अनाचकपणे पत्र्याच्या शेडमधून धूर निघायला लागल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब शाहीद शेख यांना संपर्क साधून आग लागल्याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेवून खासगी टँकरच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महापालिकेचे दोन बंब बोलावून ही आगविझविण्यात आली.

एमआयडीसी पोलिसांनी घेतली धाव-

दरम्यान, या आगीत गोडावूनमध्ये ठेवलेले संडासचे चिनीमातीचे भांडे, ५० ते ६० जुने फ्रीज, पाण्याच्या टाक्या, पाईप फिटींगचा सामान, प्लश स्टॅण्ड, पाईपाचे बंडल, सीट कव्हर हे जळून खाक झाले आहे. दरम्यान, या आगीत सुमारे ५ ते ६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा - महात्मा गांधींचे विचार लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील, मोदींचे ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details