जळगाव -जिल्ह्यात मंगळवारपासून दारू विक्रीला सुरुवात झाली. जळगाव शहरात दुपारी दोन वाजेनंतर दारू दुकाने उघडल्याने दारू खरेदी करण्यासाठी तळीरामांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. दारूच्या दुकानांवरील गोंधळ पाहता पोलिसांनी काही ठिकाणी तळीरामांवर सौम्य लाठीमार केला. अशा गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने दारूच्या दुकानांना परवानगी नाकारण्यात यावी अशी, मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
जळगावात दारू दुकानांवर उसळली तोबा गर्दी; पोलिसांचा तळीरामांवर सौम्य लाठीमार - jalgaon covid 19
जळगाव शहरात मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून दारूची दुकाने उघडली. दारू विकत घेण्यासाठी सकाळपासून रांगेत लागलेल्या तळीरामांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येक दुकानांवर लांब रांगा लागल्या होत्या.
जळगाव शहरात मंगळवारी दुपारी दोन वाजेपासून दारूची दुकाने उघडली. दारू विकत घेण्यासाठी सकाळपासून रांगेत लागलेल्या तळीरामांनी एकच गर्दी केली होती. प्रत्येक दुकानांवर लांब रांगा लागल्या होत्या. उन्हामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दुकानांसमोर काढलेली वर्तुळे, चौकानांमध्ये कुणीही थांबले नव्हते. अनेकांना तर चक्क चप्पल, बूट, पिशव्या चौकोन, वर्तुळांमध्ये ठेऊन सावलीत एकाच ठिकाणी ठिय्या मांडला होता. दुकाने उघडताच क्षणी सर्वांनी दारू मिळवण्यासाठी गर्दी केल्याने प्रचंड गोंधळ उडाला.
अनेक ठिकाणी तर ढकलाढकल, एकमेकांना मारहाण असे प्रकार घडले. त्यामुळे पोलिसांना धाव घ्यावी लागली. तळीराम सांगूनही ऐकत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार देखील केला. जळगावसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी असे गोंधळाचे प्रकार घडले. यावल तालुक्यातील फैजपुरात देखील दारूच्या दुकानांवर लांब रांगा लागल्या होत्या.