जळगाव -लॉकडाऊन काळात मद्य विक्री, तस्करी करीत असलेली कार तालुका पोलिसांनी पाठलाग करुन पकडली. या कारमध्ये १७ हजार ५५० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या मिळुन आल्या आहेत. दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी मद्य तस्करी करणारी कार पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
तालुका पोलिसांनी पाठलाग करुन पकडला १७ हजार रुपयांचा मद्यसाठा
शुभम साहेबराव पाटील (वय २१, रा. खोटेनगर) व आकाश कॅलास कुंभार (वय १९, रा. आशाबाबा नगर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. शुभम व आकाश हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजता निमखेडी शिवारातील रेल्वे गेटकडून चंदूअण्णानगर मार्गे कारने (एमएच २४ एएफ १९१९) शहरात येत होते.
शुभम साहेबराव पाटील (वय २१, रा. खोटेनगर) व आकाश कॅलास कुंभार (वय १९, रा. आशाबाबा नगर) असे ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत. शुभम व आकाश हे दोघे सोमवारी दुपारी दोन वाजता निमखेडी शिवारातील रेल्वे गेटकडून चंदूअण्णानगर मार्गे कारने (एमएच २४ एएफ १९१९) शहरात येत होते. यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कदीर तडवी, उमेश भांडारकर, हरीलाल पाटील, शामकांत बोरसे व दीपक कोळी हे बंदोबस्तासाठी रस्त्यावर उभे होते. पोलिसांनी कार थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने न थांबता पळ काढला. यावेळी पोलिसांनी दुचाकीवरुन पाठलाग करीत कांताई नेत्रालयजवळ ही कार थांबवली. या कारमध्ये डिप्लोमॅट व्हिस्कीच्या ९० मिलीलिटरच्या २७० मद्याच्या बाटल्या मिळुन आल्या आहेत. त्यांची किंमत १७ हजार ५५० रुपये एवढी आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी शुभम व आकाश या दोघांना ताब्यात घेतले. शामकांत बोरसे यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार व मद्यसाठा जप्त केला आहे.
‘त्या’ कारचालकाचा शोध सुरूच-
दरम्यान, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांनी देखील २६ एप्रिल रोजी पहाटे पाठलाग करुन एक कार (एमएच १९ एएक्स ६६०८) जप्त केली होती. या कारमध्ये ८८ हजार ३०० रुपयांचा मद्यसाठा मिळुन आला आहे. ही कार एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे राहणाऱ्या गणेश धांडे या व्यक्तीच्या नावावर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती. तपास केला असता या नावाची व्यक्ती रिंगणगाव येथे राहत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हा मद्यसाठा कोणाचा आहे? कारचालक कोण? याचा शोध पोलीस घेत आहेत.