जळगाव - सर्व संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताच्या गानकोकीळा दिवंगत लता मंगेशकर यांना जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयाने 500 किलो रांगोळीतून साकारलेल्या प्रतिकृतीतून आदरांजली अर्पण केली.
माहिती देताना विद्यार्थिनी आणि महाविद्यालयाचे संचालक हेही वाचा -Corruption Allegation on Gulabrao Patil : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा - जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचा आरोप
40 बाय 40 या आकारात साकारलेल्या या भव्य रांगोळीच्या प्रतिकृतीत पांढरा आणि काळ्या रंगाचा वापर केला आहे. लतादीदी या भारताचे भूषण असल्याने यात तिरंगा ध्वज देखील साकारण्यात आला आहे. तब्बल 5 शिक्षक आणि विद्यार्थी यांनी 24 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही रांगोळी पूर्णत्वास आणली. जळगावात लतादीदींना रांगोळीच्या माध्यमातून वाहिलेल्या या आगळ्यावेगळ्या आदरांजलीची एकच चर्चा रंगली असून अनेक जण रांगोळी पाहण्यासाठी येताना दिसून येत आहे.
यांची होती संकल्पना
रांगोळी काढून लता दीदींना आदरांजली अर्पण करण्याची संकल्पना ओजस्विनी कला विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ, प्रा. पीयूष बडगुजर, प्रा. डिगंबर शिरसाळे, प्रा. राजेंद्र सरोदे यांची आहे.
यांनी रेखाटली रांगोळी
रांगोळी रेखाटण्यात भूषण पाटील, आयुषी जैन, लक्षिता जैन, कुणाल जाधव, रिटा घुगे, सागर चौधरी, ईशा भावसार, जोती सहानी यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी के.सी.ई चे अध्यक्ष मा. नंदकुमार बेंडाळे, मु.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य भारंबे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वदोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीप केदार, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. कपिल शिंगाने, प्रा. केतकी सोनार, संजय जुमनाके आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा -Rupali Chakankar Slammed Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांना यांना महाराष्ट्रातील जनता आठवण करून देईल-रुपाली चाकणकर