महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात लग्नाच्या दिवशीच वधूने दिला बारावीच्या परीक्षेचा पेपर

कानळदा येथील एका वधूने लग्नाच्या दिवशीच बारावीच्या परीक्षेचा पेपर दिला आहे.

लग्नाच्या दिवशीच बारावीचा पेपर देताना वधू

By

Published : Feb 24, 2019, 7:39 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील कानळदा येथील एका वधूने लग्नाच्या दिवशीच बारावीच्या परीक्षेचा पेपर दिला आहे. शिक्षणाला महत्त्व देत तिने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. मोहिनी राजेंद्र पाटील असे त्या वधूचे नाव आहे.

मोहिनी पाटील ही जळगाव तालुक्यातील कानळदा येथील आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बारावीचे शिक्षण घेत असतानाच तिचे या वर्षी लग्न जमले. शनिवारी बारावी परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर होता. तर शुक्रवारी मोहिनीला हळद लागली. त्यानंतर शनिवारी तिने मराठी विषयाचा पेपर देण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या दिवशीच पेपर कसा द्यावा, असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी उपस्थित केला. मात्र, ती पेपर देण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. लग्नाच्या दिवशीच वधूचा शृंगार अंगावर असताना मोहिनीने मराठी विषयाचा पेपर दिला. मोहिनीने घेतलेल्या निर्णयाचे शिक्षकवृंदांनी स्वागत केले. पेपर दिल्यानंतर तिचा विवाह सोहळा पार पडला.

लग्नाच्या दिवशीच बारावीचा पेपर देताना वधू

शिक्षणाला महत्त्व देऊन घेतला निर्णय -

आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी मी शिक्षणाला महत्त्व देऊन बारावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे मोहिनीने सांगितले. पेपर दिल्यानंतर शिक्षकांनी मोहिनीला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details