महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीपर्व : जळगावात धनत्रयोदशीनिमित्त सराफ बाजारात सोने खरेदीसाठी तोबा गर्दी - crowd gold market jalgaon

सध्या सोन्याचा दर आज 51 हजार 300 प्रती तोळा तर, चांदीचा दर 66 हजार 500 प्रतीकिलो होता. हा दर कमी झाल्याने अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी केले. सोबत विविध प्रकारची आकर्षक फॅन्सी दागिन्यांची नागरिकांकडून खरेदी करण्यात आली, अशी माहिती आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी दिली.

jalgaon saraf market situation on dhanteras
सराफ बाजारात सोने खरेदीसाठी तोबा गर्दी

By

Published : Nov 13, 2020, 4:58 PM IST

जळगाव -संपूर्ण देशात काल गुरुवारपासून दिवाळीपर्वाला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशीचा दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा मुहूर्त आहे. या दिवशी सोने खरेदीस नागरिक पसंती देतात. यामुळे आज सकाळपासूनच सराफ बाजारातील सर्व दुकानात तोबा गर्दी झाली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. 15 ते 29 ग्रॅमच्या दागिन्यांना मोठी मागणी होती.

ग्राहक आणि सराफ व्यावसायिकांची प्रतिक्रिया.

सध्या सोन्याचा दर आज 51 हजार 300 प्रती तोळा तर, चांदीचा दर 66 हजार 500 प्रतीकिलो होता. हा दर कमी झाल्याने अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले. सोबत विविध प्रकारची आकर्षक फॅन्सी दागिन्यांची नागरिकांकडून खरेदी करण्यात आली, अशी माहिती आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी दिली.

आगामी ५ दिवस सोने बाजारात कोट्यवधी उलाढाल -

धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची पूजा केली जाते. सोने खरेदीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्ण बाजरात सोने चांदीचे शिक्के, लक्ष्मी, सरस्वती तसेच गणेशाचे सोन्याच्या शिक्क्यांना मोठी मागणी आहे. या दिवशी सोनेखरेदीचा कल ओळखून सराफ बाजारात सोन्याचा तुकडा, महालक्ष्मीचे सोन्याचे शिक्के, विविध डिझाईनचे दागिने तयार करण्यावर सराफांचा भर दिसून येतो.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी दिवाळीपर्वात सराफ बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा -दिवाळीपर्व : धनत्रयोदशीच्या दिवशी मुंबईच्या झवेरी बाजारातील परिस्थिती काय?

हजाराहून अधिक डिझाइन उपलब्ध -

सुवर्णउद्योगनगरी जळगावात दिवाळी, लग्नसराईसाठी जिल्ह्यातील सुमारे 500 प्रतिष्ठाने आकर्षक दागिन्यांनी सज्ज आहेत. साेन्यात पाच ग्रॅमपासून 50 ग्रॅमपर्यंत सुमारे 50 हजार डिझाइन उपलब्ध आहेत. लाइटवेटमध्ये टेंपल ज्वेलरीचा सर्वाधिक ट्रेंड आहे. लालसर आणि हटके लूक असणाऱ्या गाेल्ड आणि गेरू, अँटिक दागिन्यांची क्रेझ आहे. कानातले टॉप्स, ब्रासलेट, मंगळसूत्र, नेकलेस, कोल्हापुरी साज असे प्रकार आहेत.

पाडवा, भाऊबीज एकाच दिवशी -

आज धनत्रयोदशी, यमदीपदान आहे. या दिवशी व्यापारी खतावणी खरेदी करतात. त्यासाठी सकाळी साडेआठ ते साडेअकरा आणि दुपारी एक ते अडीच तसेच सायंकाळी सात ते रात्री नऊ असे मुहूर्त आहेत. तर शनिवारी नरक चतुर्दशी असल्याने सकाळी अभ्यंगस्नानासाठी सकाळी 5 वाजून 31 मिनिटांपासून मुहूर्त आहे. याच दिवशी लक्ष्मीपूजन असून, सायंकाळी 5.59 ते 8.33 लाभ मुहूर्त तर 9 ते 12२ यावेळेत अमृत मुहूर्त आहे. तर सोमवारी भाऊबीज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details