महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jalgaon Corona Outbreak : धोका वाढला, जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 39 रूग्ण आढळले - Jalgaon Reports New COVID-19 Cases

जळगाव जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढत होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकुण 39 बाधित रूग्ण आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव
जळगाव

By

Published : Jan 6, 2022, 1:51 PM IST

जळगाव -महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक ( Corona outbreak in Maharashtra ) पाहायला मिळतोय. जळगाव जिल्ह्यात ( Jalgaon Corona Cases Update ) कोरोना रूग्ण संख्येत वाढत होताना दिसून येत आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात एकुण 39 बाधित रूग्ण ( Jalgaon Reports 39 New COVID-19 Cases ) आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण 39 रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात 17, भुसावळ तालुका 9, अमळनेर 1, चोपडा 3, एरंडोल 4, चाळीसगाव 5 असे एकुण 39 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 906 बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 1 लाख 40 हजार 236 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आता 91 बाधित रूग्ण संख्या झाली असून विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने नागरीकांनी कोरोनाची लक्षणे जाणवताच तातडीने तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

कोरोनाचा शिरकाव

कोरोनाचा उद्रेक सर्वत्र होत असतानाच आता जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे एकाच दिवसात तिपटीने रुग्ण वाढले आहेत. मात्र हा कोरोना बाहेरून जिल्ह्यात येत असल्याचे तपासण्यांवरून समोर येत आहे. सद्य स्थ‍ितीत बाधित रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे बाहेरून प्रवास करून आलेले आहेत.

जिल्ह्यातील ॲक्टीव्ह केसेसे एकाच दिवसात थेट 91 वर पोहचल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. यातील 12 रुग्णांना लक्षणे आहेत. अशा स्थीतीत आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुंबईत एकाच दिवसात १५ हजारांवर रुग्ण समोर येणे ही चिंतेची बाब आहे. कारण मुंबई व पुणे येथून जळगावात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

शहरात धोका वाढतोय

शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. सातत्याने शहरात रुग्ण वाढून येत आहेत. त्यातच यातील 90 टक्के रुग्ण हे बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करून आलेले आहेत. विशेष बाब म्हणजे ज्यांना लक्षणे होती त्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली आहे. अशी माहिती समोर येत आहे.

कोणी करावी तपासणी -


बाहेरील राज्यातूनच तसेच जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी चाचणी करून घ्यावी. विशेषत: मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांनी दक्षता घ्यावी.ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आहेत, त्यांनी तपासणी करावी.
लवकर निदान झाल्यास गांभिर्य टाळता येते.
कोविड नसल्याचे स्पष्ट झाल्यास नियमीत उपचार घ्यावेत.शासकीय तंत्रनिकेतनच्या कोविड तपासणी केंद्रावर कोरोनाची तपासणी होते.

तारांबळ उडते तर आधी टेस्ट करा - डॉ. संजय पाटील


कोविड आणि अन्य व्हायरल इंफेक्शनची लक्षणे सारखी असल्याने तारांबळ उडू शकते, तेव्हा आधी चाचणी करा खात्री करून घ्या, कोविड आहे का नाही आणि त्यानंतर उपचार घ्या. बाहेरून आलेल्यांनीही ही दक्षता घ्यावी. त्रिसूत्रीचे पूर्ण पालन होणे गरजेचे आहे. कोरोनाचा आलेख हा वाढलेला आहे. असे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा -Third Wave of Corona : कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाने तिसऱ्या लाटेसाठी जालना आरोग्य विभाग सज्ज

ABOUT THE AUTHOR

...view details