जळगाव - राज्यातील महानगर पालिकेच्या महापौरपदांसाठी आरक्षण सोडत बुधवारी पार पडणार आहे. याबाबतचे पत्र जळगाव महानगरपालिका आयुक्तांना मंगळवारी प्राप्त झाले आहे. राज्यातील महापालिकांची संख्या सध्या 27 आहे आणि त्यांची सोडत मुंबई मध्ये दुपारी तीन वाजता पार पडणार आहे.
राज्यातील महापौरपदांसाठी आरक्षण सोडत; जळगाव पालिकेबाबत काय होणार? हेही वाचा - राज्यात भाजपविरहीत सत्ता येणार या भितीने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय - बाळासाहेब थोरात
जळगाव महापालिकेची ऑगस्ट 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली आहे. यात पहिल्या अडीच वर्षासाठी महापौर पद महिला राखीव झाले होते. हा अडीच वर्षांचा कालावधी मार्च 2021 मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर नवीन महापौर निवड होणार आहे. अडीच वर्षांनंतर होणार महापौर कोणत्या आरक्षणातील असेल, याची निश्चिती आज होणाऱ्या आरक्षण सोडतीत स्पष्ट होणार आहे. ऑगस्ट 2018 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर पदाची संधी जळगाव शहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना मिळाली होती. गेल्या 13 महिन्यांपासून त्या महापौर म्हणून काम पाहत आहेत.
पुढील काही महिन्यात राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत. त्या महानगरपालिकांचे निवडणुकीआधी महानगरपालिकांच्या महापौर पदाकरिता आरक्षण सोडत बुधवारी दुपारी काढण्यात येणार आहे. मंत्रालयात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत ही काढली जाणार आहे. याबाबतचे पत्र अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्तांना पाठवले आहे. मुंबई येथे मंत्रालयात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत बैठक काढण्यात येणार आहे.
शासनाने काढलेल्या पत्राकानुसार नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत महापौर पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती, सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांची देखील सोडतीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापौरपदाचा आरक्षण सोडत कशा पद्धतीने होते त्यानुसार आगामी निवडणुकीत अनेक उमेदवारांची महापौर पदासाठी मोर्चेबांधणी आतापासून सुरू होईल अस दिसत आहे.
हेही वाचा - आमदार रवी राणांचा व्हिडिओ व्हायरल,शरद पवारांना केली भाजपला पाठिंबा देण्याची विनंती