महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुसऱ्या टप्प्यात 25 हजार फ्रंटलाइन वर्कर्सना मिळेल कोरोना लस - jalgaon frontline workers news

फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे 25 हजार जणांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.

jalgaon
jalgaon

By

Published : Feb 5, 2021, 3:09 PM IST

Updated : Feb 5, 2021, 3:18 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून (शुक्रवारी) सुरुवात झाली. या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून पोलीस आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे 25 हजार जणांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाणार आहे.

अद्याप उद्दिष्टपूर्ती नाही

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शुक्रवारी दुपारी कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. याठिकाणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी लस टोचून घेतली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची उपस्थिती होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यात उद्दिष्टपूर्ती मात्र झालेली नाही. त्यानंतर आता जिल्ह्यात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यात 15 ठिकाणी सुरू आहे लसीकरण

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वी 8 जानेवारीला ड्रायरन झाला होता. तो यशस्वी झाल्यानंतर 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली. जिल्ह्यात 15 केंद्रांवर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर एका दिवसाला 100 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सला लस दिली जात असल्याने जिल्ह्यात दोन केंद्र अजून वाढवण्यात आले आहेत. कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे सर्वांनी लस घेण्यासाठी स्वतःहून पुढे यायला हवे, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.

लस घेतल्यावर काय म्हणाले जिल्हाधिकारी अन् पोलीस अधीक्षक?

दुसऱ्या टप्प्यात सर्वात आधी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी लस घेतली. कोरोनाची लस ही सर्वच पातळ्यांवर यशस्वी ठरली आहे. त्यानंतरच लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लस घेतल्यावर ताप येणे किंवा अन्य त्रास होणे म्हणजे लस आपल्या शरीराला अनुकूल असल्याची लक्षणे आहेत. म्हणून घाबरून न जाता तसेच अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन लस घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राऊत आणि पोलीस अधीक्षक मुंडे यांनी केले. लस घेतली तरी मास्कचा वापर, सॅनिटायझेशन आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Feb 5, 2021, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details