महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावातील कोरोना : पाचोऱ्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण, सत्ताधारी-विरोधकांमध्ये मात्र आरोप-प्रत्यारोप - जळगाव पाचोरा न्यूज

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका पूर्णपणे ग्रामीण भागात मोडतो. जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांना जोडणारा हा तालुका. या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. पाचोरा तालुक्यात दररोज दोन आकडी संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे. अशातच शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील रुग्णही उपचारासाठी याच ठिकाणी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार वाढतच चालला आहे.

पाचोऱ्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण
पाचोऱ्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण

By

Published : May 9, 2021, 9:44 AM IST

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने आरोग्य यंत्रणा अक्षरशः हतबल झाली आहे. आता तर कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याने चिंता वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील विसंवाद कोरोनाच्या पथ्थ्यावर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोरोना संसर्गाचा वेग कायम असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उपाययोजनांच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला आहे.

पाचोऱ्यात वाढत्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवर ताण
उपचारासाठी साधनांचा तुटवडाजळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका पूर्णपणे ग्रामीण भागात मोडतो. जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यांना जोडणारा हा तालुका. या तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कायम आहे. पाचोरा तालुक्यात दररोज दोन आकडी संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडतो आहे. अशातच शेजारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव तालुक्यातील रुग्णही उपचारासाठी याच ठिकाणी दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार वाढतच चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग काही केल्या कमी होत नसल्याने परिस्थिती बिकटच आहे. त्यामुळे बेड, कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच इतर औषधी व साधन सामग्रीचा तुटवडा जाणवत आहे.पंधरवड्यात 800 नव्या रुग्णांची भरपाचोरा तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा विचार केला तर याठिकाणी आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. त्यातील सुमारे 4 हजार रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, तालुक्यातील 125 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेच्या तुलनेत भयावह आहे. गेल्या 15 दिवसांच्या आकडेवारीनुसार तालुक्यात सुमारे 800 रुग्णांची भर पडली आहे. तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत तालुक्यात सहाशेपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असून, त्यातील निम्मे रुग्ण हे गृह तसेच संस्थात्मक विलगीकरणात आहेत.कोरोना निर्बंधांचे उल्लंघनपाचोऱ्यात स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याचा आरोप केला जात आहे. तर नागरिकही कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. मात्र, हेच निर्बंध धाब्यावर बसवल्याने कोरोना हातपाय पसरत आहे. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सूट देण्यात आली आहे. पण याच काळात बाजारपेठेत गर्दी उसळत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर कोरोनाला अटकाव करणे शक्य होणार नाही. कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.बेड्सचा भासत आहे तुटवडापाचोरा तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. तालुक्याची मदार एक ग्रामीण रुग्णालय तसेच 14 कोविड केअर सेंटरवर आहे. परंतु, नव्याने समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या घटत नसल्याने बेड मॅनेजमेंट चुकत आहे. ग्रामीण रुग्णालयात 30 बेड्सची व्यवस्था आहे. हे बेड्स ऑक्सिजन प्रणालीचे आहेत. सद्य स्थितीत सर्व बेड्स फुल्ल आहेत. इतर कोविड सेंटरमध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना थेट जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये रेफर केले जाते. तर ज्या रुग्णांना इतर खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य आहे, ते शेजारील औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणांचा पर्याय निवडत आहेत.रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठी तारेवरची कसरतजिल्ह्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पाचोरा तालुक्यात देखील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मध्यंतरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केला. दरम्यान, ऑक्सिजनच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट उभारला जाणार आहे. या प्लांट उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच तो कार्यान्वित होणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली.सत्ताधारी-विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपकोरोनासाठीच्या उपाययोजनांच्या मुद्द्यावरून स्थानिक सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी बोलताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट उसळली तेव्हा सर्वच ठिकाणी तिचा प्रभाव जाणवला. तसा तो पाचोरा तालुक्यात देखील होता. मात्र, प्रशासनाच्या मदतीने योग्य त्या उपाययोजना केल्याने आता संसर्ग आटोक्यात आहे. ग्रामीण रुग्णालय आणि 14 कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर शेजारील सोयगाव व कन्नड तालुक्यातील रुग्णांचा देखील भार पडत असल्याने अडचणी येत आहेत. दुसरीकडे कोरोनाच्या सातत्याने चाचण्या सुरू आहेत. समोर येणाऱ्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत. आता लसीकरणाची गती वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी शक्य ते प्रयत्न होत असताना विरोधक मात्र, मदतीऐवजी छोट्या गोष्टींवरून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार किशोर पाटील यांनी केला. दुसरीकडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सांगितले की, पाचोरा तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती कठीण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होत नाहीये. मध्यंतरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे दोन रुग्णांचा जीव गेला. मात्र, आरोग्य यंत्रणा कानावर हात ठेऊन आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असताना प्रशासन कारवाई करत नाही. ग्रामीण रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा नाहीत. या साऱ्या परिस्थितीला लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप अमोल शिंदेंनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.15 मे नंतर आठवडाभर जनता कर्फ्यूतालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी 15 मे नंतर आठवडाभर जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेले निर्बंध 15 मे पर्यंत कायम आहेत. मात्र, त्यानंतर स्वयंस्फूर्तीने सर्वांनी आपले व्यवसाय बंद ठेवत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सहकार्य करावे, असा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details