जळगाव - पाटलीपूत्र एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला ( Patliputra Express Accident ) आहे. या ट्रेनची कपलींग तुटल्याने अर्धी रेल्वे पुढी गेली, मात्र अर्धी रेल्वे मागे राहिल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली.
रेल्वे वाहतूक खोळंबली - पाटलीपूत्र एक्सप्रेस या धावणाऱ्या रेल्वेचे अर्धे डब्बे कपलींग तुटल्याने इंजिनसह पुढे निघून गेले होते. तर अर्धे डब्बे मागे राहिल्याने प्रवाशांची एकच धांदल उडाली. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळ घटना घडली. सुदैवानं कोणालाही दुखपत झाली नाही. काही वेळ रेल्वेची वाहतूक खोळंबली होती.