जळगाव : गो हत्या, लव जिहाद व धर्मांतर विरोधात जळगाव मध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना व हिंदू समाज बांधवांच्या वतीने विराट हिंदू जनसंघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. (Hindu Jan Sangharsh Morcha in Jalgaon). छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा जन संघर्ष मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या जाहीर सभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील सहभाग नोंदवत विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवेदन स्वीकारले. राज्य सरकार हिंदुत्ववादी संघटना व हिंदू बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
संजय राऊतांवर सडकून टीका :आमच्यावर सातत्याने टीका केल्या जातात. संजय राऊत हे देखील सातत्याने आमच्यावर टीका करतात. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत यांना जी 41 मते मिळाली ती फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाली असून तुम्ही पक्ष बाजूला ठेवला, धर्मच टिकला नाही तर तुमचा पक्ष कुठे वाचणार, असा हल्लाबोलही गुलाबराव पाटलांनी केला आहे.