महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 11, 2021, 11:27 PM IST

Updated : Jul 12, 2021, 2:07 AM IST

ETV Bharat / state

जळगावकरांसाठी रविवार ठरला अपघातवार; दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चौघे ठार

पहिला अपघात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जाडगाव फाट्याजवळ घडला. यात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. हा अपघात होऊन तीन तास उलटत नाही, तोच बोहर्डी फाट्याजवळ रात्री साडेसात वाजता अपघात घडला.

four dies in two different accident in jalgaon
जळगावकरांसाठी रविवार ठरला अपघातवार

जळगाव -रविवारचा दिवस हा जळगावकरांसाठी अपघातवार ठरला. जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर काही तासांच्या अंतराने झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण ठार झाले. अपघातातील मृतांमध्ये दोन सख्खे चुलत भाऊ तसेच बहीण-भावाचा समावेश आहे. दोन्ही अपघातांची वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

पहिला अपघात सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जाडगाव फाट्याजवळ घडला. यात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचचाकीवरील दोघे तरुण ठार झाले. हा अपघात होऊन तीन तास उलटत नाही, तोच बोहर्डी फाट्याजवळ रात्री साडेसात वाजता अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दाताळा येथील बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पिंपळगाव बुद्रुकचे सख्खे चुलत भाऊ ठार -

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पहिला अपघात झाला. या अपघातात पिंपळगाव बुद्रुक येथील सोपान रमेश मावळे (वय 18) व सचिन सुभाष मावळे (वय 17) हे दोघे ठार झाले. दोघे सख्खे चुलत भाऊ होते. सोपान आणि सचिन हे दीपनगर येथे आत्याच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेलेले होते. कार्यक्रम आटोपून ते दीपनगर येथून (एमएच 14 सीटी 4798) क्रमांकाच्या दुचाकीने पिंपळगाव बुद्रुकला येत होते. महामार्गावर त्यांच्या दुचाकीला (एमएच 15 एफव्ही 1413) क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. त्यात सचिन हा जागीच ठार झाला तर उपचारासाठी रुग्णालयात हलवताना सोपानचा मृत्यू झाला.

हेही वाचा -लेह-लडाख येथे कर्तव्यावर असताना जळगावच्या जवानाला वीरमरण; मंगळवारी होणार अंत्यसंस्कार

दुसऱ्या अपघातात दोघे बहीण-भाऊ ठार -

दुसरा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बोहर्डी फाट्याजवळ सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात पूजा विनोद कोळी व दुर्गेश विनोद कोळी (दोघे रा. दाताळा, ता. रावेर) या बहीण-भावाचा मृत्यू झाला. पूजा आणि दुर्गेश हे दोघे दुचाकीने भुसावळवरून दाताळा येथे जात होते. बोहर्डी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कारने धडक दिली.

महामार्गावरील अपूर्ण कामे ठरताहेत अपघाताला कारणीभूत -

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी यामुळे अपघात होत आहेत. रविवारी झालेले दोन्ही अपघात देखील अशाच प्रकारे घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.ट

हेही वाचा -देशात डेल्टा प्लसनंतर 'कप्पा व्हेरिएंट'चा धोका

Last Updated : Jul 12, 2021, 2:07 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details