जळगाव-शहरालगत शिरसोली रोडवरील जंगलात बुधवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीत १९ हेक्टरावरील गवत खाक झाले आहे. वनविभागाचे कर्मचारी तसेच मोहाडी व शिरसोली येथील दीडशे ते दोनशे ग्रामस्थ यांच्या एकत्रित प्रयत्नानंतर पहाटे एक वाजेच्या सुमारावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घटनास्थळी सिगारेटचे पाकिट आढळून आले असून कुणीतर पेटलेली सिगारेट तशीच फेकून दिल्याने ही आग लागल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव; आगीत शिरसोली रोडजवळील १९ हेक्टरवरील गवत खाक - shirsoli fire
प्रेमीयुगल तसेच अनेक तरुण या डोंगराळ भागात फिरतात. यादरम्यान कुणीतरी सिगारेट पिल्यानंतर पेटलेली सिगारेट फेकून दिल्याने ही आग लागल्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार याप्रकरणी वनपाल डी.जे. सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी लागली होती आग-
शिरसोली रोडवरील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्र क्रमांक ४०७ मध्ये व कुरण क्रमांक २६ मध्ये बुधवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली होती. आगीची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वन परिक्षेत्र अधिकारी आर.जे.राणे, वनपाल पी.जे.सोनवणे, वनरक्षक सी.व्ही पाटील, दिपक पाटील, अश्विनी देसाई, सीमा कांबळी, डी.बी. पवार यांच्या वनमजूर अशा एकूण १५ जणांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचार्यांसह मोहाडी व शिरसोली असे एकूण १५० ते २०० ग्रामस्थांनी झाडाचा पाला, गोणपाट यांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नानंतर रात्री एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
सिगारेटमुळे आग लागल्याचा अंदाज-
या आगीत १९ हेक्टरवरील गवत खाक झाले असून कुठल्याही वृक्षांचे तसेच वन्यप्राण्याचे नुकसान झालेले नसल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जे.राणे यांनी बोलतांना दिली. या परिसरात महाविद्यालय आहे. प्रेमीयुगल तसेच अनेक तरुण या डोंगराळ भागात फिरतात. यादरम्यान कुणीतरी सिगारेट पिल्यानंतर पेटलेली सिगारेट फेकून दिल्याने ही आग लागल्याची शक्यता राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार याप्रकरणी वनपाल डी.जे. सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.