जळगाव -कोरोना संसर्ग वाढत असल्याने गणपती मिरवणूक काढण्यात बंदी असतानाही नवीपेठेतील एका मंडळाने गणपती प्रतिष्ठापनेच्या दिवशी वाजत-गाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीचा व्हिडिओ पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेशोत्सव; कोरोना काळात काढली मिरवणूक, गणेश मंडळावर गुन्हा दाखल - ganesh mandal news in jalgaon
स्थापनेच्या दिवशी नवी पेठ मंडळाने श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्याचा व्हिडीओ पाच दिवसानंतर व्हायरल झाला. पाच दिवसानंतर हा व्हिडीओ सहायक पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहोचला.
नवी पेठ मंडळाने २२ ऑगस्टला स्थापनेच्या दिवशी श्री गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्याचा व्हिडीओ पाच दिवसानंतर व्हायरल झाला. पाच दिवसानंतर हा व्हिडीओ सहायक पोलीस उपअधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्यापर्यंत पोहचला. हा व्हिडीओ त्यांनी पडताळणीसाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण निकम यांना पाठविला. चौकशीअंती व्हिडीओत जागा नवीपेठेतील सारस्वत चौकाकडून जयप्रकाश नारायण चौकाकडे जाणारा रस्ता दिसून येत होता. तसेच आठ ते दहा कार्येकर्ते नाचताना दिसून येते होते. सार्वजनिक गणेश मंडळ हे नवीपेठ मित्र मंडळ असल्याचे निष्पन्न झाले होते.
शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलीस नाईक मनोज सुभाष पाटील यांच्या तक्रारीवरुन नवीपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद नारायण अग्रवाल, उपाध्यक्ष मनिष शामसुंदर झंवर, खजीनदार विनोद अशोक मुंदडा, सचिव सुनील सुरेश जोशी, सल्लागार अमोल राजेंद्र जोशी, मिरवणुकीत नाचणारे कार्यकते, वाद्य वाजविणारे तसेच वाहनमालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.