महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंटेन्मेंट झोनमध्ये हलगर्जीपणा केल्यास गुन्हे दाखल करा; जळगावच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना - corona virus

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी महापौरांच्या दालनात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.

jalgaon
कंटेन्मेंट झोनमध्ये हलगर्जीपणा केल्यास गुन्हे दाखल करा; जळगावच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

By

Published : May 5, 2020, 11:49 AM IST

जळगाव -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन निश्चित करण्यात आले आहे. या क्षेत्रात सर्व उपाययोजना प्राधान्याने कठोरपणे राबवाव्यात. कंटेन्मेंट झोनमध्ये जे नागरिक शासनाच्या निर्देशांचे पालन करणार नाहीत; प्रशासनाला खोटी माहिती देतील, स्वतःची खबरदारी घेण्यात हलगर्जीपणा करतील अशांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या.

कंटेन्मेंट झोनमध्ये हलगर्जीपणा केल्यास गुन्हे दाखल करा; जळगावच्या महापौरांच्या प्रशासनाला सूचना

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने योग्य त्या उपाययोजना राबविण्यासाठी महापौरांच्या दालनात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसचिव सुनील गोराणे, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. राम रावलानी, डॉ. विकास पाटील, किशोर चौधरी आदी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व उपाययोजनांचा महापौर भारती सोनवणे यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची १०० टक्के तपासणी करा. प्रत्येकाला आरोग्य सेतू ऍप सक्तीने डाऊनलोड करायला सांगा. तपासणी पथकाला चुकीची माहिती देणारे आणि खरी माहिती लपवून ठेवणाऱ्यांवर कारवाई करा. कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेऊ नका. क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीमध्ये लक्षणे आढळून आल्यास त्यांचा वेगळा गट करा. विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवून वॉर्ड ऑफिसरने पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करावी. प्रभागात फिरताना मनपा अधिकारी, आशा वर्कर व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. पाणी बॉटल, ओआरएस पावडर सोबत ठेवा. पोलीस प्रशासनाची अधिकाधिक मदत घ्या. कंटेन्मेंट झोनमधील व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करा, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी मांडल्या.

आयुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले की, कोरोना संसर्गाचा मूळ स्त्रोत शोधा. जेणेकरून कोरोनाला अटकाव घालण्यात मनपा प्रशासनाला यश येईल. डॉक्टरांसह ज्या व्यक्ती लो रिस्कमध्ये असतील तरच त्यांना होम क्वारंटाइन करण्याची परवानगी द्या. उद्या जर वैद्यकीय सेवेसाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासल्यास त्यादृष्टीने आजच नियोजन करून ठेवा. सार्वजनिक शौचालये दररोज निर्जंतुक करा. कंटेन्मेंट झोनमधील एकही संशयित नजरेतून सुटता कामा नये. सर्वेक्षण करताना नगरसेवक, स्थानिक समाजसेवकांची मदत घ्या. थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमिटर आणि पीपीई किट तातडीने खरेदी करा. शहरात २ फिवर क्लिनिक सुरू करा, त्याठिकाणी सर्व यंत्रणा उभारा. आवश्यकता भासल्यास आयएमए, रेडक्रॉसची मदत घ्या. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथी डॉक्टरांची मदत घेऊन औषधी वितरित करा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

मनपा प्रशासनाला दोन्ही आमदारांनी ५०-५० लाख रुपये देऊन एक महिना झाला तरीही आवश्यक असलेल्या वैद्यकीय सामुग्रीचे स्पेसिफिकेशन काढण्यास दिरंगाई होत असल्याची बाब नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लक्षात आणून दिली. या मुद्द्याला डॉ. राधेश्याम चौधरी यांनी देखील दुजोरा दिला. डॉ.चौधरी म्हणाले की, प्रत्येक प्रभागात बाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाऊन परत आलेल्या व्यक्तींची माहिती घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण करताना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, जुना फुफुसांच्या आजाराची तसेच त्या कुटुंबातील नागरिकांच्या व्यवसाय देखील नोंद करण्याची सूचना त्यांनी मांडली. मनपाच्या आरोग्य व्यवस्थेतील मनुष्यबळ कमी पडत असल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे विनंती करून अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करावी, असेही त्यांनी नमूद केले.

रुग्ण उशिरा माहिती देत असल्याने मृत्युदर वाढण्याची शक्यता-

रुग्ण माहिती लपवत असल्याने त्यांच्यावर योग्यवेळी योग्य पद्धतीने उपचार केले जाऊ शकत नाही. रुग्ण गंभीर परिस्थिती असताना रुग्णालयात येत असल्याने त्यांच्यावर पुरेसा उपचार होत नसल्याने त्यांचा मृत्यू ओढवतो आहे. काही रुग्णांचा मृत्यू घरीच होत असल्याची बाब बैठकीत समोर आली. रुग्णांनी लक्षणे दिसतात वेळीच प्रशासनाला माहिती दिल्यास त्यांचा जीव वाचू शकतो, असाही मुद्दा बैठकीत मांडण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details