महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किसान रेल्वेगाडी आता आठवड्यातून दोन दिवस, शेतकऱ्यांना माल पार्सल करण्याची सोय

शेतकऱ्यांचा माल परप्रांतात पाठवण्यासाठी २५ ऑगस्टपासून किसान पार्सल रेल्वे गाडी दर मंगळवारी आणि शुक्रवारी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शेतकऱ्यांनी माल पॅकिंग करून हा आपल्या जवळपासच्या पार्सल ऑफिसमध्ये आणण्याच्या व कागदपत्रांसंबधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

किसान रेल्वेगाडी आता आठवड्यातून दोन दिवस
किसान रेल्वेगाडी आता आठवड्यातून दोन दिवस

By

Published : Aug 24, 2020, 8:44 PM IST

जळगाव (भुसावळ) : शेतकऱ्यांच्या मागणीवरुन २५ ऑगस्टपासून किसान पार्सल रेल्वे गाडी दर मंगळवारी आणि शुक्रवारी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत-जास्त माल परप्रांतात पाठवता येणार आहे.

००१०७ डाऊन देवळाली ते मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी ही मंगळवारी आणि शुक्रवारी देवळालीहून सायंकाळी सहा वाजता सुटल्यानंतर, गुरुवारी आणि रविवारी पहाटे ३.५५ वाजता मुजफ्फरपूरला पोहोचेल. ही गाडी नाशिक रोडला ६.१०, मनमाड ७.३०, जळगाव ९.५५, भुसावळ १०.४५, बुधवार आणि शनिवारी बऱ्हाणपूरला रात्री १२.५, खंडवा २.१० वाजता पोहोचेल.

या गाडीला इटारसी, पिपरीया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापूर या ठिकाणी थांबा आहे. अप मार्गावरील गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी आठ वाजता सुटल्यानंतर शुक्रवारी आणि सोमवारी ५.४५ वाजता देवळालीला पोहोचेल.

शेतकऱ्यांनी माल पॅकिंग करून हा आपल्या जवळपासच्या पार्सल ऑफिसमध्ये आणावा. सोबत आधार कार्डची झेरॉक्स ठेवावी. शेतकरी, कार्गो अ‍ॅग्रीग्रेटर, व्यापाऱ्यांनी जवळच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

ABOUT THE AUTHOR

...view details