महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी - लोकसभा

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेआधी पूर्वनियोजन केले जात आहे.

मतमोजणीची तयारी

By

Published : May 11, 2019, 3:32 PM IST

जळगाव- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेआधी पूर्वनियोजन केले जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 25 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 23 फेऱ्या होणार आहेत.


जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांसाठी एमआयडीसीनजीक असलेल्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. याठिकाणी जळगाव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचे स्वतंत्र कक्ष असतील. दुसऱ्या भागात रावेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचे कक्ष असणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यात जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 25 तर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 23 फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी कक्षात हजारावर कर्मचारी असणार आहेत. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी एकमेकांच्या कक्षात जाऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली असून दोन्ही मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रंगाचे टी-शर्ट दिले जाणार आहेत.


मतमोजणी प्रक्रियेत सुरुवातीला पोस्टल तसेच सैनिकांकडून आलेल्या मतांची मोजणी होणार आहे. यावेळी प्रथमच सैनिकांच्या मतदानावर बारकोड नंबर दिले आहेत. त्यांची बारकाईने मोजणी करावी लागणार असल्याने सैनिकांच्या मतांची मोजणी करण्यास तब्बल पाच ते सहा तास लागतील, अशी शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानाची मतमोजणी होईल. दुपारी एक वाजेदरम्यान ईव्हीएमवरील मते मोजली जातील. सायंकाळी सहा वाजेच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details