महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दुचाकींच्या स्पेअरपार्टची विल्हेवाट लावणाऱ्यांना अटक - Jalgaon police action

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला जळगाव एंमआयडीसी पोलिसांना गजाआड केले आहे. ११ दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Two-wheeler thief arrested
दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक

By

Published : Nov 13, 2020, 8:27 PM IST

जळगाव- शहरातून दुचाकी चोरून स्पेअर पार्ट वेगळे करून विल्हेवाट लावणाऱ्या टोळीला मू.जे. महाविद्यालयाजवळ स्थानिक गुन्हे शाखेने पकडले. तिघांना अटक करून सात दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव २०२० LIVE : प्रभू श्रीरामांची शोभायात्रा अयोध्येत दाखल, मुख्यमंत्री योगींनी घेतले रामलल्लाचे दर्शन

शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून त्यांच्या सुटे भागांची परस्पर विक्री करून सुरत येथे मौजमजा करण्यासाठी निघालेल्या शाहरूख खान सलिम खान (वय-२०, रा. पाटील चक्की जवळ, सुप्रीम कॉलनी) आणि अमन सय्यद रशिद (वय-१८, अजिम किराणा दुकानाजवळ, सुप्रीम कॉलनी) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मू.जे. महाविद्यालयाजवळ अटक केली. दोघांनी एकूण ११ दुचाकी चोरल्या असून त्यापैकी ४ दुचाकी तिसरा सहकारी इमराज रमजान पटेल (वय-२१, रा. सुप्रीम कॉलनी) याला विल्हेवाट लावण्यासाठी दिल्या होत्या. त्यालाही पथकाने अटक केली आहे.

हेही वाचा -अयोध्या दीपोत्सव! अयोध्येत 5 लाख 51 हजार दिवे उजळणार

ABOUT THE AUTHOR

...view details