जळगाव Dhanteras 2023:गेल्या वर्षापेक्षा यंदा सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांची दरवाढ नोंदवली गेली. असं असलं तरीही आज धनत्रयोदशी निमित्त ग्राहकांची सोनं खरेदीसाठी गर्दी होत आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. (buy gold on occasion of Dhantrayodashi) ग्राहकांच्या गर्दीमुळे सुवर्णनगरी आज चांगलीच गजबजल्याचं पाहायला मिळालं. गेल्या वर्षी सोन्याचे भाव हे पन्नास हजार रुपये पर्यंत होते. हेच भाव आता यावर्षी साठ हजारापर्यंत पोहोचले आहे. सोन्याच्या दरात वाढ झाली असतानाही मात्र आज मुहुर्तावर सोनं खरेदीसाठी ग्राहकांनी सराफ बाजारात गर्दी केल्याचं दिसून आलं. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांकडून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या आकर्षकाच्या डिझाईनमध्ये सोन्याचे दागिने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच लक्ष्मीपूजन लक्षात घेता चांदीची लक्ष्मी चांदीची लक्ष्मीची नाणीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली असून हे खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा मोठा कल दिसून येत आहे. (Diwali 2023)
लग्नसराईसाठीही सोन्याची खरेदी :गेल्या वर्षापेक्षा दरवाढ झाल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. मात्र, थोडंफार का होईना सोनं खरेदी करण्यासाठी महिला ग्राहकांनी सोन्याच्या दुकानात मोठी गर्दी केल्याचं चित्र आज सुवर्णनगरीत पाहायला मिळालं. काही दिवसांनी लग्नसराईसुद्धा आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनंसुद्धा नागरिक आजच खरेदी करताना दिसून येत आहेत.
24 कॅरेट शुद्ध सोने : सराफ व्यापारी अंकितने सांगितले की '24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे. २४ कॅरेटच्या दागिन्यांमध्ये ९९.९९ टक्के शुद्ध सोने असते. मात्र, त्याचे दागिने बनवणं सोपं नाही. कारण शुद्धतेमुळे त्यापासून बनवलेले दागिने लवकर खराब होतात. एम्बॉससह टॉप आणि रिंग 24 कॅरेटमध्ये बनविल्या जातात. अशा परिस्थितीत 22 कॅरेट आणि 20 कॅरेटपासून 18 कॅरेटचे दागिने मजबूत असतात, ती दीर्घकाळ टिकते.