महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील - देवेंद्र फडणवीस - दंतवैद्यकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा ई-भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला.

देवेंद्र फडणवीस

By

Published : Sep 15, 2019, 1:42 PM IST

जळगाव- महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालये मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहेत. केंद्र सरकारने 1 हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. येत्या 2-3 वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्याचा लाभ राज्यातील जनतेला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - जळगाव जिल्ह्यात पावसाने ओलांडली वार्षिक सरासरी; आतापर्यंत १०१ टक्के पावसाची नोंद

पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अंतर्गत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाचा ई-भूमिपूजन सोहळा रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या दालनात करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, राज्य शासनाने जळगाव येथे वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी व भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पध्दती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा शासनाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पध्दतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - महिला सुरक्षेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक; जळगावात सरकारचे घातले श्राद्ध

या महाविद्यालयात ऑगस्ट 2018 पासून प्रथम वर्षाची तुकडी प्रवेशित झाली आहे. या महाविद्यालयासाठी 136 एकर जागा चिंचोली शिवारात मंजूर झाली आहे. 500 खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 19190.24 लाख रुपये, निवासस्थाने वसतिगृहाच्या बांधकामासाठी 26695.65 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 2019-2020 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी क्षमता 100 वरुन 150 करण्यात आली आहे. तसेच सीपीएस, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमालाही मान्यता मिळाली आहे. याशिवाय शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगावसाठी 100 विद्यार्थी प्रवेशास मान्यता प्राप्त झाली आहे.

यावेळी महापौर सीमा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. किरण पाटील, अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details