महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कापूस खरेदीत गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी शिकवला धडा; वसूल केले 51 हजार रुपये

जिल्ह्यातील तांदळी गावात एका व्यापाऱ्याने कापूस खरेदी करताना मापात घोळ केल्याची घटना घडली. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला धडा शिकवला. त्याच्याकडून 51 हजार रुपये वसूल केले.

जळगाव कापूस खरेदी
जळगाव कापूस खरेदी

By

Published : Nov 5, 2020, 1:23 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील तांदळी गावात एका शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करताना व्यापाऱ्याने वजन-मापात तफावत करून तीन क्विंटल कापूस चोरल्याचा प्रकार उघडकीस आला. घडलेला प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. संतप्त शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला धडा शिकवत, त्याच्याकडून 51 हजार रुपये वसूल केले.

शेतकऱ्याने अगोदरच मोजला होता कापूस -

साक्री तालुक्यातील कापूस व्यापारी तांदळी गावात कापूस खरेदीसाठी आलेला होता. प्रति क्विंटल 5 हजार रुपये इतक्या चढ्या भावाने सौदा झाल्यावर गावात अशोक भालेराव पाटील या शेतकऱ्याचा कापूस मोजणीस घेतला. त्यावेळी कापसाचे वजन 17 क्विंटल भरले. प्रत्यक्षात 20 क्विंटल कापूस शेतकर्‍यानेच घरात मोजून भरलेला होता. एकदम तीन क्विंटल कापसाची तफावत आढळल्याने शेतकरी व ग्रामस्थांना वजन काट्यावर संशय आला. ग्रामस्थांनी जाब विचारला असता व्यापारी गडबडून गेला.

राममंदिरास 51 हजार रुपये देणगीचा दंड -

शेवटी शेतकरी आणि व्यापारी यांच्यात तडजोड होऊन गावाच्या राम मंदिरासाठी 51 हजार रुपये रोख देणगी आणि शेतकरी अशोक पाटील यांना तीन क्विंटल कापसाची रक्कम 15 हजार 225 रुपये देऊन व्यापाऱ्याने गावातून काढता पाय घेतला. सध्या इतर व्यापारी 4700 रुपये प्रति क्विंटल कापूस खरेदी करत असताना या व्यापाऱ्याने 5 हजार रुपये इतक्या चढ्या भावाचे आमिष दाखविले अन शेतकरी अलगद फसले. मात्र त्यांच्या मापातील पाप लक्षात आल्याने त्यांनी व्यापाऱ्यालाच धडा शिकवला.

ABOUT THE AUTHOR

...view details