जळगाव-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम आहे. बुधवारी (आज) दिवसभरात पुन्हा ९९६ नवे बाधित रुग्ण समोर आले आहे. चिंतेची बाब म्हणजे, एकीकडे मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असताना दुसरीकडे कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबत नसल्याची स्थिती आहे. बुधवारी देखील दिवसभरात ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५३२ रुग्णांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला बुधवारी रात्री ७२९० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यात ९९६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ७३५७१ इतकी झाली आहे. तर ५३२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ६३५५९ वर पोहचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात दररोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील आता वाढून ८५५० झाली आहे. त्यात १८४६ रुग्ण लक्षणे असलेले तर ६७०४ रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. ऍक्टिव्ह रुग्णांपैकी ५३७० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.