जळगाव- शहरातील सागर पार्कच्या जागेच्या मुद्द्यावरून महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष शिवसेनेत शीतयुद्ध रंगले असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सागर पार्कच्या जागेचे आरक्षण काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारकडून आयुक्तांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आमदार सुरेश भोळे यांनी केला होता. तसेच त्यांनी यासंदर्भात शहरातील एका वकिलांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावरून मंगळवारी (दि. 8 डिसें.) शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी आमदार भोळेंना लक्ष्य केले. 'वकिलांपेक्षा आमदार सुरेश भोळे यांचीच नार्कोटेस्ट करण्याची गरज आहे. म्हणजे सागरपार्क, वॉटरग्रेस यासह अनेक सत्य बाहेर येथील', अशा शब्दात जोशी यांनी आमदार भोळेंवर हल्लाबोल केला आहे.
आमदार भोळे यांनीच थांबवून ठेवल्याचा आरोप
महापालिकेत विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी व नगरसेवक नितीन बरडे यांनी मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी आमदार सुरेश भोळे यांच्या आरोपांना उत्तरे दिली. यावेळी नितीन बरडे म्हणाले, महापालिकेने सागर पार्क मैदानाची जागा रितसर न्यायालयीन लढ्याने जिंकली आहे. या जागेबाबत लुंकड परिवाराने मोबदला मागितला आहे. ही जागा महापालिकेचीच असल्याने आयुक्त महापालिकेच्या हिताचाच अहवाल पाठविणार आहेत. त्यामुळे 100 कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही, असे बरडे यांनी सांगितले. तसेच सागरपार्क या जागेवर महापालिकेने मैदानाच्या सुशोभिकरणासाठी 2017 मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, आज तीन वर्षे झाले हे काम आमदार भोळे यांनीच थांबवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.
अनंत जोशींनी केला गौप्यस्फोट