महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात रसायनाने भरलेला टँकर उलटला; डिझेल टाकी फुटून लागली आग - shahabaz shaikh

समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाने भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन उलटला.

घटनास्थळावरील दृश्य

By

Published : May 29, 2019, 3:32 PM IST

जळगाव- समोरून भरधाव येणाऱ्या चारचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने रसायनाने भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातानंतर टँकरच्या डिझेलची टाकी फुटून टँकरला आग लागली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात जळगाव शहरातील खोटेनगरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळावरील दृश्ये


ठाणे येथून एक टँकर (क्र. एम एच ०४ जी आर ११९२) नायट्रेट अॅसिड घेऊन नागपूरला चालला होता. जळगाव शहरातील खोटेनगरजवळ जळगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातानंतर टँकरची डिझेल टाकी फुटून आग लागली. टँकरमध्ये रसायन असल्याने महामार्गावरुन दुतर्फा जाणारे वाहनचालक प्रचंड भयभित झाले होते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीचा खोळंबा झाला होता.


रसायन भरलेला टँकर उलटल्याची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच तहसीलदार वैशाली हिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. टँकरमध्ये भरलेले नायट्रेट ऍसिड हे ज्वालाग्राही नसल्याने स्फोट होण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.

ABOUT THE AUTHOR

...view details