जळगाव - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संदर्भात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य सरकारने तातडीने कॅबिनेटची बैठक घेऊन अध्यादेश काढला. कॅबिनेटच्या याच बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्ते आबासाहेब पाटलांच्या कानात काहीतरी सांगत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेचे चंद्रकांत पाटलांनी आज जळगावात खंडण केले आहे.
माझं बायकोशी खासगी बोलणं नसतं तर आबासाहेबांशी काय खासगी बोलणं असेल; 'त्या' विषयावर चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण - cabinet
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर या विषयी तोडगा काढण्यासाठी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी आंदोलनकर्ते आबासाहेब पाटलांच्या कानात नेमकं काय सांगितलं? काय झाली नेमकी चर्चा? विद्यार्थी सोबत असताना वेगळी चर्चा कशाला? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
माझं बायकोशी खासगी बोलणं नसतं तर आबासाहेब पाटलांशी काय खासगी बोलणं असेल', अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. या विषयासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढला. त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घ्यायला हवे होते. परंतु, जोपर्यंत आम्हाला संकेतस्थळावर अध्यादेश दिसत नाही; म्हणजेच गॅझेट होत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा विद्यार्थ्यांचा पवित्रा होता. या विषयासंदर्भात नेमकी काय तांत्रिक अडचण आहे, याबाबत मी आबासाहेब पाटलांच्या कानात बोललो. मी त्यांना तेव्हा असे सांगितले की, आपण शनिवारी-रविवारी सुट्टी असताना गॅझेट केले तर हा न्यायालयात हरकतीचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे आपण सोमवारी या विषयासंबंधी गॅझेट करूया, हीच बाब मी बोललो. पण त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या. माझं बायकोशी खासगी बोलणं नसतं तर आबासाहेब पाटलांशी काय खाजगी बोलणं असेल, अशा संतप्त शब्दात चंद्रकांत पाटलांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर या विषयी तोडगा काढण्यासाठी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी आंदोलनकर्ते आबासाहेब पाटलांच्या कानात नेमकं काय सांगितलं? काय झाली नेमकी चर्चा? विद्यार्थी सोबत असताना वेगळी चर्चा कशाला? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या विषयावर पडदा पडला आहे.