जळगाव -चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार ( MVA Government ) पडणार, यासाठी अनेक वेळी तारखा त्यांनी जाहीर केल्या. मात्र, चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( NCP Leader Eknath Khadse ) यांनी केली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे -
बहुमत पेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहे. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. सरकार पडायला ठोस कारण असला पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोपर्यंत हे सरकार करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आणि एकनाथ खडसे यांनी दिली आहे. वाईन बाबत एक विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहे. वाईन ही दारू आहे, त्यामुळे अण्णा हजारे यांनी यासाठी विरोध केला आहे. मध्यप्रदेश मध्ये मॉलमध्ये बियर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्रप्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारूही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ, असे वक्तव्य येथील प्रदेश अध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाइनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो, याची वाट पाहिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांची एकनाथ खडसे यांनी पाठराखण केली आहे.
हेही वाचा -Raju Shetty Statement On MVA Government : महाविकास आघाडी स्थापन करण्यास आम्ही देखील उंबरठे झिजवले - राजू शेट्टी