महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसानं केला घात अन् झाला अपघात; कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू

Kannad Ghat Car Accident : कन्नड घाटात कारचा भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य सात प्रवासी गंभीर जखमी आहेत. पाऊस सुरू असल्यामुळं कार चालवताना नियंत्रण सुटलं व थेट अन्य गाड्यांना धडक दिली.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 4:33 PM IST

जळगाव Kannad Ghat Car Accident : चाळीसगाव- छत्रपती संभाजी नगर मार्गावरील कन्नड घाटात मध्यरात्रीच्या सुमारास कार व अन्य वाहनांचा भीषण अपघात (Jalgaon Accident News) झाला. या अपघातात चार प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे. प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०) , वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय ३६) व पूर्वा गणेश देशमुख (वय ८ वर्ष) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका चिमुरडीचा समावेश असून, ते एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.

पावसामुळं गाडीवरील नियंत्रण सुटलं :प्रकाश शिर्के हे कुटुंबियांसोबत MH 41 V4816 या क्रमांकाच्या कारने छत्रपती संभाजीनगरकडून मालेगावकडे जात होते. यादरम्यान अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. चालकाला अंदाज न आल्याने कन्नड घाटामध्ये कार व इतर वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेनंतर कार थेट खोल दरीत कोसळली. यात कारमधील प्रकाश शिर्के, पत्नी शिलाबाई शिर्के तसेच नातेवाईक वैशाली सूर्यवंशी व आठ वर्षांची मुलगी पूर्वा देशमुख या चौघांचा जागीच मृत्यू झाला. या कारमधील काही तरुण तसेच इतर काहीजणसुद्धा जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरू :या भीषण अपघातात अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी, जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी, सिधेस पुरुषोत्तम पवार, कृष्णा वासुदेव शिर्के, रूपाली गणेश देशमुख, पुष्पा पुरूषोत्तम पवार, वाहन चालक अभय पोपटराव जैन हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव महामार्ग केंद्राच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सातही जखमींवर उपचार सुरू आहेत.

कन्नड घाटात वाहतूक कोंडी : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळं कन्नड घाटात दरड देखील कोसळली होती. त्यामुळे वाहने चालवताना मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातच हा अपघात झाल्याने घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होऊन तत्काळ मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले.

हेही वाचा -

  1. ठाण्याहून चंदगडकडे निघालेल्या एसटीचा कोल्हापुरात भीषण अपघात; 15 प्रवासी जखमी
  2. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
  3. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर लालपरीचा अपघात, चाकं निखळल्यानं बस पलटली, तीन प्रवासी गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details