महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कल जहाँ मेले लगते थे, आज वह सुना पडा हैं'; खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मुक्ताईनगरातील भाजप कार्यालयाला कुलूप!

माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने मुक्ताईनगरातील भाजप कार्यालयाला कुलूप लागले आहे.

BJP office in Muktainagar
खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालयाला कुलूप

By

Published : Oct 24, 2020, 4:30 PM IST

जळगाव -'कल जहाँ मेले लगते थे, आज वह सुना पडा हैं' अशीच काहीशी अवस्था जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयाची झाली आहे. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने मुक्ताईनगरातील भाजप कार्यालयाला कुलूप लागले आहे. एरवी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची वर्दळ राहणाऱ्या भाजपच्या कार्यालयात, खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने मुक्ताईनगरमधील भाजप कार्यालयाला कुलूप

हेही वाचा -जीएसटी मोबदला: अखेर केंद्राकडून ६ हजार कोटी रुपये १६ राज्यांना वितरित

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुक्ताईनगरमध्ये भाजपवर मोठा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुक्ताईनगरमधील भाजपचे काय होईल? याबाबत चर्चा रंगत होती. आता खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने मुक्ताईनगरात भाजपचे अस्तित्व कमी झाल्याचे चित्र आहे. खडसेंसोबत भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील राष्ट्रवादीत गेले आहेत.

कार्यालयात कोणी आलेच नाही-

मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. खडसेंवर भाजपने केलेल्या अन्यायाच्या विरोधात खडसेंबरोबर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली. यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठी सुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचे चित्र आहे. खडसे भाजपवर नाराज असतानाच मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयावरील पक्षाचे फलक देखील काढण्यात आले होते. खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश म्हणजे मुक्ताईनगरात भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details