महाराष्ट्र

maharashtra

जळगावात स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे राजेंद्र घुगे बिनविरोध

By

Published : Oct 22, 2020, 6:14 PM IST

जळगाव महानगरपालिकेत आज स्थायी समिती सभापतींची निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत भाजपाच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. पीठासन अधिकारी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

Rajendra Ghuge
राजेंद्र घुगे

जळगाव - महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीसाठी आज विशेष सभा झाली. सभापतीपदासाठी भाजपाकडून राजेंद्र घुगे तर, शिवसेनेकडून नितीन बरडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडीदरम्यान, शिवसेनेने माघार घेतल्यामुळे सभापतीपदी राजेंद्र घुगे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी भाजपाच्या रंजना सपकाळे यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे त्यांचीही निवड बिनविरोध झाली. पीठासन अधिकारी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

राजेंद्र घुगे प्रतिक्रिया व्यक्त करताना

नूतन सभापतींनी पदभार स्वीकारला -

सभापती निवडीची प्रक्रिया पीठासन अधिकारी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली. स्थायी सभापती निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ दिली गेली. शिवसेनेचे नितीन बरडे यांनी त्यावेळत माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे राजेंद्र घुगे यांची बिनविरोध निवड झाली. नूतन स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे यांनी अ‍ॅड. शुचिता हांडा यांच्याकडून तर नूतन महिला बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांनी शोभा बारी यांच्याकडून पदभार स्वीकारला. नूतन स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण सभापती यांचा मास्क आणि सॅनिटायझर देवून सत्कार करण्यात आला.

विकास करण्याचा सकारात्मक प्रयत्न करणार -

पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी विश्‍वास दाखवून संधी दिली. विकासाच्या अनुषंगाने शिवसेनेनेही पाठिंबा दिला. गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार आणि त्यांच्या प्रेरणेतून राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देईल. सभापतीपदाची संधी मिळाल्यामुळे शहराचा विकास करण्याचा सकारात्मक प्रयत्न करणार आहे, असे राजेंद्र घुगे यांनी सांगितले.

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details