महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात मद्यसाठा करुन वाहतूक करणाऱ्यास अटक

सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु (वय ५५, रा. आर.वाय. पार्क) हा कारमधुन (एमएच १९ सीव्ही ००१०) मोठ्या प्रमाणात मद्यसाठा घेऊन जात होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अडवुन चौकशी केली.

jalgaon
जळगावात मद्यसाठा करुन वाहतूक करणाऱ्यास अटक

By

Published : May 6, 2020, 10:47 AM IST

जळगाव-मद्यविक्री सुरू होताच बेकायदेशीरित्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा खरेदी करून साठवणुकीसाठी कारने वाहतूक करणाऱ्या एकास एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. कारमधील ३७ हजार रुपयाची देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.

सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु (वय ५५, रा. आर.वाय. पार्क) हा कारमधुन (एमएच १९ सीव्ही ००१०) मोठ्या प्रमाणात मद्यसाठा घेऊन जात होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अडवुन चौकशी केली. हा मद्यसाठा इच्छादेवी चौफुलीवरील विजय वाईन्सवरून घेतला आहे. दुकानाचे मालक मुफद्दर अलीहुसेन अमरेलीवाला (रा.आदर्शनगर) यांच्याकडे घेऊन जात असल्याचे मुन्ना याने पोलिसांना सांगीतले. परंतू, याबाबत कोणताही परवाना नसल्याने त्याच्या ताब्यातील देशी विदेशी मद्य व बियर असे ३७ हजार रूपयांचे मद्य व २० लाख रुपयांची फोर्ड कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपी सैय्यद मुन्ना सैय्यद बाबुमन्नु यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेकायदेशीर विक्रीसाठी मद्यसाठा

विजय वाईनचे मालक मुफद्दर अलीहुसेन यांच्या घरी हा मद्यसाठा घेऊन जात असल्याची माहिती मुन्ना याने दिली. दरम्यान, काही दिवसात पुन्हा एकदा मद्यविक्री बंद झाल्यानंतर घरी ठेवलेले मद्य ज्यादा दरोने विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details