महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव आरटीओ कार्यालयात 'एसीबी'चा ट्रॅप; वाहन हस्तांतरणासाठी २०० रुपयांची लाच मागणाऱ्या पंटरविरुद्ध गुन्हा

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी येथील आरटीओ कार्यालयात ट्रॅप लावला होता. त्यात वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही २०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने, एका पंटरविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ACB's trap at Jalgaon RTO office
ACB's trap at Jalgaon RTO office

By

Published : Oct 29, 2021, 12:39 AM IST

Updated : Oct 29, 2021, 12:57 AM IST

जळगाव -नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी येथील आरटीओ कार्यालयात ट्रॅप लावला होता. त्यात वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही २०० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने, एका पंटरविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, या पंटरला रंगेहात अटक करण्यासाठी दाेन वेळा ट्रॅप लावण्यात आला होता. परंतु, तो हाती लागला नव्हता. अखेर लाच मागितल्याच्या व्हाईस रेकॉर्डिंगवरून ही कारवाई करण्यात आली.

जळगाव आरटीओ कार्यालयात 'एसीबी'चा ट्रॅप

प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पू भोळे (रा. भुसावळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोळे हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांचा पंटर असल्याचे तक्रारदाराने फिर्यादीत म्हटले आहे. वाहन प्रतिनिधी गणेश कौतिकराव ढेंगे (वय ५९, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश ढेंगे हे ६ ऑक्टोबर रोजी जितेंद्र सोनार यांची दुचाकी (एमएच १९ सीसी ७७००) हस्तांतरणासाठी आरटीओ कार्यालयात गेले होते. त्यांनी शासकीय शुल्क ४०० रुपये भरले. यानंतर भोळे याने आणखी ३०० रुपये लागतील असे सांगितले. हे ३०० रुपये अधिकाऱ्यांच्या सह्यांपोटी लागतील असे त्याने सांगितले होते. भाेळे हा लाच मागत असल्यामुळे ढेंगे यांनी ८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे जाऊन लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार ११ रोजी भोळेला रंगेहात अटक करण्यासाठी ११ राेजी पथक जळगावात पोहोचले. पंच रवींद्र जाधव यांच्यासह ढेंगे आरटीओ कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी भोळे याला गाठून पैशांबाबत बोलणी केली. तेव्हा त्याने २०० रूपये लाच मागितली. भोळेच्या सांगितल्यानुसार, ढेंगे अकील नावाच्या मुलाकडे गेले. दोघांमध्ये पैशांबाबत बोलणी झाली. २०० रुपये नंतर देणार असल्याचे ढेंगेंनी सांगितले. यानंतर ढेंगे पुन्हा एसीबीच्या पथकाकडे आले होते. भोळे व अकील याांच्याशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग झालेले होते. त्यावरुन भोळे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुरुवारी भोळेच्या विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांची २४ कोटी ६३ लाखांची फसवणूक


तपासात अधिकारीही अडकणार?

ढेंगे यांनी दिलेल्या फिर्यादीत लाच मागणारा भोळे हा आरटीओ श्याम लोही यांचा खासगी व्यक्ती असल्याचे नमूद केले आहे. या शिवाय भोळे याच्याशी झालेल्या संवादातून इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील पैसे द्यावे लागतात, असे रेकॉर्डींग उपलब्ध आहे. त्यामुळे आता भोळे विरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासात काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Last Updated : Oct 29, 2021, 12:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details