महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एरंडोल नगरपरिषदेने उभारली वातानुकूलीत शौचालये; पंतप्रधान कार्यालयाकडून दखल - शौचालय

ही शौचालये नागिरकांसाठी मोफत आहे. हायटेक शौचालयामुळे महिलांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे नागिरकांकडून याचे स्वागत होत आहे.

वातानुकूलीत शौचालय

By

Published : Feb 24, 2019, 7:45 PM IST

जळगाव - स्वच्छ भारत अभियानाची पुरेपूर अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे केल्याचे समोर आले आहे. एंरडोल नगरपरिषद १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यात तेथील प्रशासनाला यश आले आहे. नगरपरिषदेने ३ ठिकाणी वातानुकूलीत, तर ११ ठिकाणी हायटेक शौचालये उभारली आहेत. त्यामुळे याचा वापर करण्याकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसत आहे.

एंरडोल शहरातील नागरिक पूर्वी उघड्यावर शौचास जात असत. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली. २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून ३२० सीटची १४ सार्वजनिक शौचालये बांधण्याचा प्रस्ताव तयार केला. यातील ३ शौचालये वातानुकूलीत असतील असा निर्णय झाला. २०१७ मध्ये या शौचालयांचे लोकार्पण करण्यात आले. ही शौचालये नागिरकांसाठी मोफत आहे. हायटेक शौचालयामुळे महिलांची गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे नागिरकांकडून याचे स्वागत होत आहे.

शौचालयांची वैशिष्ट्ये

या शौचालयांमध्ये सर्व सुविधा पुरवल्या गेल्या आहेत. २४ तास मुबलक पाणी, वीजपुरवठा, हात धुण्यासाठी बेसीन, टिश्यूपेपर, साबण, कचरापेटी, महिलांसाठी सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशीन, आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. शौचालयात पुरुष आणि महिला कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांसाठी तक्रारपेटीही बसविण्यात आली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून दखल


एरंडोल नगरपरिषदेच्या या उपक्रमाची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माहितीसाठी नगरपरिषदेकडून माहितीपट मागविण्यात आला आहे. या माहितीपटाचा अभ्यास करून शौचालयाचा हा उपक्रम इतर ठिकाणी राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details