महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अभाविप' आणि 'राष्ट्रीय सुरक्षा मंच'तर्फे #CAA कायद्याच्या समर्थनार्थ जळगावात भव्य मोर्चा - जनजागृतीपर मोर्चा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे जळगावमध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. 'सीएए के सन्मान में हम सब मैदान में', 'नागरिकत्व संशोधन कायदा देशाच्या हिताचा' या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर यावेळी दणाणून गेला होता.

march in support of citizenship research law in Jalgaon
नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ जळगावात मोर्चा

By

Published : Dec 21, 2019, 3:13 PM IST

जळगाव -नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ आज शनिवारी जळगावमध्ये राष्ट्रीय सुरक्षा मंच तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी या कायद्याचे स्वागत करत जल्लोष केला. शहरातील टॉवर चौकापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. कोर्ट चौक, जिल्हा क्रीडा संकुल, बसस्थानक, स्वातंत्र्यचौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

नागरिकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ जळगावात मोर्चा....

हेही वाचा... केंद्र सरकारने थकविली ईसीएचएसची रक्कम; रुग्णालये थांबविणार विनारोकड सेवा

हा कायदा देशाच्या हिताचा आहे. मात्र, काही देशविघातक शक्ती या कायद्याविषयी अपप्रचार करत आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. तसेच सामाजिक शांततेचा भंग करणाऱ्या या बाबीचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.

हेही वाचा... विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज अंतिम दिवस; शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी हा मोर्चा आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रुपांतर झाले. सभेला अनेक वक्त्यांनी संबोधित केले. पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश येथील अत्याचार पीडित निर्वासित हिंदू, बौद्ध, जैन, शीख, पारसी व ईसाई बांधवांना नागरिकत्त्व देण्यासंदर्भात भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत ऐतिहासिक असे नागरिकत्त्व सुधारणा विधेयक बहुमताने पारित झाले आहे. त्यानंतर देशाच्या राष्ट्रपतींची त्या विधेयकावर स्वाक्षरी होऊन त्याचे नागरिकता संशोधन कायद्यात रूपांतर झाले आहे. या कायद्याचे सर्वत्र स्वागत होत असताना, काही लोक कायद्याच्या विरोधात जाऊन देशात अराजकता माजवण्याचे काम करत आहेत. असा आरोप यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तसेच राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे करण्यात आला.

हेही वाचा... #CAA Protest LIVE : उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनामध्ये 10 जणांचा मृत्यू

'सीएए के सन्मान में हम सब मैदान में', 'नागरिकत्व संशोधन कायदा देशाच्या हिताचा', 'वंदे मातरम', भारत माता की जय', अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर यावेळी दणाणून गेला होता. मोर्चा शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details