जळगाव -एकीकडे कोरोना, अतिवृष्टी व अवकाळी अशा संकटांना शेतकरी तोंड देत आहेत. दुसरीकडे शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत आता 'सीसीआय'ने कोणतीही पूर्वकल्पना न देता कापसाच्या दरात ११५ रुपयांची घट केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सीसीआय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पूर्वसूचना न देताच कापसाचे दर कमी केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांना नोटीस बजावली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शासकीय खरेदी केंद्रावर वाढत जाणारा व्यापाऱ्यांचा प्रभाव, सीसीआयच्या अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांसोबत असलेली मिलीभगत यामुळे व्यापाऱ्यांप्रमाणेच आता सीसीआयच्या केंद्रावर देखील शेतकऱ्यांची लुट सुरु झाली आहे. शासनाने कापसाला ५ हजार ७२५ इतका हमीभाव निश्चित केला असतानाही सुरुवातीलाच सीसीआयने ओलाव्याचे कारण देत शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी केला. त्यानंतर आता शेतकऱ्यांचा चांगला माल विक्रीसाठी येवू लागल्यानंतर आता कापसाची प्रत खालावली आहे, असे कारण देत सीसीआयने हमीभावात ११५ रुपयांची घट केली आहे. आर्द्रतेचे कारण देत सीसीआयच्या केंद्रावर कापसावर कट्टी लावण्याचे धोरण देखील सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी अवलंबले आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुट सुरु असल्याने शेतकऱ्यांकडून सीसीआयच्या मनमानी निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या विषयाबाबत सीसीआयच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.
शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा -
जळगाव तालुक्यातील काही शेतकरी मंगळवारी आपला माल घेवून आव्हाणे येथील सीसीआयच्या केंद्रावर आले. त्याठिकाणी सीसीआयने भावात केलेल्या घटमुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. ग्रेड लावून कट्टी लावल्यास सीसीआय विरोधात आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. आधीच कट्टी लावून हमीभावात २०० ते ३०० रुपये कमी दराने मालाची खरेदी केली जात असताना, आता अचानकपणे भावात घट करून, हमीभावापेक्षा पाचशे रुपये कमी दरात माल खरेदी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सीसीआयने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देताच दर कमी केले, असा आरोप आव्हाणे येथील प्रगतीशिल शेतकरी भगवान श्रीधर चौधरी यांनी केला.
शेतकऱ्यांची फिरवा-फिरव-