महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सामरोद, मोयखेडा-दिगर जंगलातील पाणवठ्याजवळ ३५ वन्यप्राण्यांचा मृत्यू; विषप्रयोग झाल्याचा संशय

सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना निलगायी आणि राडुकरं मृत असलेली आढळली. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली.

मृत आढळलेले प्राणी

By

Published : May 28, 2019, 9:16 PM IST

जळगाव- जंगलात एकाचवेळी 20 निलगायी आणि 15 रानडुकरं मृत आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना जामनेर तालुक्यातील सामरोद, मोयखेडा-दिगर शिवारात उघडकीस आली. या प्राण्यांवर विषप्रयोग करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसून या प्राण्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट झाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मृत आढळलेले प्राणी


शेतात निघालेल्या शेतकऱ्यांना आज दुपारी जंगलात ठिकठिकाणी निलगायी तसेच रानडुकरं मृतावस्थेत आढळून आली. त्यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही शेतकऱ्यांचे जबाब नोंदवून घेत घटनेचा पंचनामा केला. जंगलात एका पाणवठ्यापासून काही अंतरावर हे प्राणी मृतावस्थेत आढळल्याने पाणवठ्यातून प्राण्यांवर विषप्रयोग झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या दृष्टीने वनविभागाचे अधिकारी तपास करत आहेत.


जामनेर तालुक्यातील शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी माकडांवर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता एवढ्या मोठ्या प्रमाणात निलगायी तसेच रानडुकरं मृत आढळल्याने विषप्रयोग करून त्यांची हत्या झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. जामनेर तालुक्यातील सामरोद, मोयखेडा-दिगर परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात निलगायी तसेच रानडुकरं आहेत. हे प्राणी शेतांमध्ये पिकांची नासधूस करतात, म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. याच संतापातून एखाद्याने या प्राण्यांवर विषप्रयोग केल्याचा संशय वनाधिकाऱ्यांना आहे.


अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही


वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. परंतु, प्राण्यांच्या मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट झालेले नसल्याने याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. या वन्य प्राण्यांच्या मृत्यूमागील कारणांचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details