हिंगोली -येथील जिल्हा परिषद कार्यालयात पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्याला जिल्हा परिषद सदस्यांच्या पतीने झोडपले आहे. जवळपास १० ते १५ मिनिटे कार्यालयात झटापट सुरू होती. एवढेच नव्हे तर केबिनमधून मारत-मारत दालनात आणले. दरम्यान, कार्यालयातील खुर्च्याही अस्ताव्यस्त फेकून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारी एकच्या सुमारास घडला.
पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला जिप सदस्याच्या पतीची मारहाण - enginer
हिंगोली येथील सेनेच्या जिल्हा परिषदेचे वातावरण नेहमीच या ना त्या कारणाने तापलेले असते. आज तर चक्क पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली.
ए. आर. कुंभारीकर असे त्या उप अभियंत्याचे नाव आहे. तर माऊली झटे असे मारहाण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य पतीचे नाव आहे. सिंधुताई झटे उखळी सर्कलच्या जिल्हापरिषद सदस्या आहेत. हिंगोली येथील सेनेच्या जिल्हा परिषदेचे वातावरण नेहमीच या ना त्या कारणाने तापलेले असते. आज तर चक्क पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयातच फ्री स्टाईल हाणामारी झाल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली. विशेष म्हणजे या उपअभियंत्याला केबिनमधून मारत-मारत दालनामध्ये आणण्यात आले होते. अचानक हाणामारीचा प्रकार सुरू असल्याचे पाहून कार्यालयातील सर्वच कर्मचारी गोंधळून गेले होते. जोर-जोरात सुरू असलेल्या मारहाणीमुळे कोणी धरायला देखील समोर येत नव्हते. आरडा-ओरड सुरू असल्याने आजूबाजूच्या कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाकडे धाव घेतली.
मारहाण करणारे अभियंत्यांनी अतिरिक्त सीईओचे दालन गाठले. जवळपास एक ते दीड तासापासून चर्चा सुरू होती. तर अभियंत्यासोबत गेलेल्या कर्मचाऱ्यांना काही वेळेनंतर बाहेर काढून देण्यात आले. बराच वेळापासून काय चर्चा सुरू आहे. जिप उपाध्यक्ष अनिल पतंगे म्हणाले, की हा सर्वप्रकार गैरसमजुतीमधून झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही जिप सदस्यांच्या पतीला समजून सांगणार आहोत, असे सांगत प्रकरण निवळल्याचे सांगितले. अतिरिक्त सीईओ यांच्या कार्यालयातील वातावरण शांत असले तरी बाहेर मात्र एकच खळबळ उडालेली होती.